Showing posts with label mission. Show all posts
Showing posts with label mission. Show all posts

Saturday, April 17, 2010

पूर्वार्ध

    कर्नल दगड हे भारतीय आर्मी मधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्याचे वरिष्ठ अधिकारीदेखील त्याच्याशी अत्यंत आदराने बोलायचे.तसे पाहिल्यास कर्नलच्या व्यक्तिमत्वास तोड नव्हती हेच खरे. कमावलेले शरीर,बुलंद छाती,पहाडी आवाज,कठोर चेहरा आणि एकूणच रुबाबदार अंगकाठी.अनेक तरुणी ह्या पाषाणाच्या मागे घिरट्या घालत होत्या, पण ध्येयवान कर्नलने  कोणालाही दाद दिली नव्हती.
    भारताचे अंतर्गत गुप्तहेर खातेसुद्द्धा ह्या हिऱ्यावर आपले लक्ष ठेवून होते. एक दिवस कर्नलला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बोलावणे आले. तेथे स्वतः गृहमंत्री आणि आणखी २-३ अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी कर्नलला त्यांची ओळख करून दिली. त्यातील एक RAW चे  माजी प्रमुख होते आणि एक IB
चे अत्यंत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी कर्नलला भारताची सध्याची अंतर्गत परिस्थिती कथन केली. देशात त्यावेळेस अत्यंत महागाई वाढली होती. पाण्याची कमतरता जाणवत होती. भ्रष्टाचाराला ऊत आला होता. त्यातच अनेक प्रादेशिक पक्ष नवीन राज्यानिर्मितीच्या मागणीसाठी त्या-त्या राज्यांना वेठीस धरत होते. ह्या प्रादेशिक पक्षांमागे आपल्याच मंत्रांची फूस असावी अशी गृहमंत्र्यांना शंका होती. त्यामुळे ह्या समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी IB ची एक ५-६ जणांची टीम करायचे ठरवले,व त्या टीमचे नेतृत्व करण्याची कर्नलला गळ घालण्यात आली. कर्नलकडे सुवर्णसंधी चालून आली होती. आपल्या देशभक्तीची हीच कसोटी आहे असं त्याला मनातून वाटत होतं. त्यामुळे त्याने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली.
    त्या पथकासाठी आणखी ५ जणांची निवड करण्यात आली. ह्या निवडीत कर्नलने जातीने लक्ष घातले होते. पाचहीजण अत्यंत शूर होते. अर्थात अशा पथकासाठी कर्नलपेक्षा आणखी कोणी योग्य असूच शकत नाही, ह्याविषयी कोणाच्याही मनात दुमत नव्हत.
    हे ५ जण विविध क्षेत्रातील तज्ञ होते. ते त्याला मदत कर्नल असले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरणार नव्हते. ते काम अर्थातच त्यांच्या सर्वगुणसंपन्न नायकावरच सोपवण्यात आले होते. कामगिरी सुरु होण्याआधी सर्वांचे खडतर प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण सामुदायिक तसेच आपापल्या क्षेत्राशी निगडीतही होते. त्यातून तावून सुलाखून बाहेर निघाल्यावर ते कामगिरीसाठी सज्ज झाले होते.
    सर्वाना आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि साधन-सामुग्री देण्यात आली. पथकाचे नामकरण ND-Hard (Non-Destroyable Hard) असे करण्यात आले तर Mission चे नाव होते
                              "Operation State Freezer".
    कर्नलला अनेक मुभा देण्यात आल्या. कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड टॉक-टाईम, हवा तेवढा पैसा, कोठेही लाचारी पत्करण्याची मुभा, इत्यादी. त्यामुळे कर्नलला missed-call ऐवजी आपण call करतो आहोत व हवी तेवढी मिसळ ढोसतो आहोत असं दिवास्वप्न दिसू लागलं. 
   त्याला अत्यंत दुर्मिळ असे स्थान देण्यात आले. त्यामुळे तो आता "Lachar Agent 009" बनला व त्याचा कोडवर्ड होता "बांड, तरणा-बांड".
                                                                             (क्रमशः)
 (जेम्स बॉंड कथेवरून प्रेरित)