लँब दारूची दुसरी बाटली संपवून उठला. आज त्याने नेहमीपेक्षा तासभर जास्त व्यायाम केला होता. आपल्या शरीरावरचे बळकट स्नायू पाहून तो उन्मत्त झाला. त्याने खाण्या-पिण्याचे पैसे न देण्याचा निश्चय केला.
हॉटेलमधून बाहेर जाता जाता त्याने कुत्सित नजरेने कुणालकडे बघितले. कुणाल नेहमीप्रमाणे गल्ल्यावर बसून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. दिवसभरातील १२ तास गल्ल्यावर लोळणे व उरलेला वेळ घरी लोळणे हीच त्याची दैनंदिनी बनून गेली होती. एका वेटरने मात्र लँबला बिलाबद्धल हटकले. लँबने इंग्रजीत काहीतरी बरळत त्याला दूर ढकलले. तो वेटर धडपडला व त्या आवाजाने कुणालचे लक्ष विचलीत झाले. कुणालने कोणालातरी खुण केली.त्याचक्षणी विद्युतगतीने कर्नल गजनीकांत लँबसमोर आला. "First of all, Good evening" कर्नल म्हणाला, "आपण बिलाचे पैसे दिलेले नाहीत. कृपया ते द्या". लँबने गजनीकांतकडे पहिले. बाह्यस्वरूपावरूनतरी त्याच्यात काही दम आहे असे लँबला वाटले नाही. "अबे हाट" तो ओरडला व सवयीने त्याने इंग्रजीत ४-५ शिव्या झाडल्या. कर्नल दगडासारखा निश्चल उभा होता. शेवटी लँबला संताप आवरला नाही. त्याने आपल्या मुष्टीने गजनीकांतच्या छातीवर प्रहार केला आणि क्षणभरातच दगड हातांवर मारावा तसा रडू लागला. क्षणार्धातच कर्नलची लाथ त्याच्या पोटावर बसली. त्याचे पोट गलबलले. कर्नलने पुन्हा लाथ झाडली पण त्यावेळी लँबने त्याचा पाय पकडून त्याला फरशीवर आदळले. लँबने कर्नलचा शर्ट पकडून ओढला तर कर्नल तसूभरही हलला नाही. त्याचा शर्ट मात्र फाटला. कर्नलने आपली छाती गोंदवून घेतली होती. एका बाजूला 'सुजाता' व दुसऱ्या बाजूला 'काटाकिर्र' अशी ती अक्षरे होती.
गजनीकांत उठला. त्याची व लँबची झुंज सुरु झाली. लँब कर्नलचा गळा पकडण्याचा प्रयत्न करत होता पण कर्नल त्याचा हा डाव वारंवार चुकवत होता. शेवटी चिडून लँबने कर्नलच्या डोक्यावर प्रहार केला.
कर्नल blank झाला. त्याला काहीच आठवेना. समोर कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे एवढेच त्याला दिसले. त्याने 'च्यामायला' म्हणत डोके खाजवले. आणि तत्क्षणी कर्नलची स्मरणशक्ती परत आली. तसेच त्याच्या अंगी शेकडो दगडांचे बळही संचारले.
संपूर्ण ताकदीनीशी त्याने लँबवर २-३ प्रहार केले आणि लँब मूर्च्छित होत कोसळला.
(क्रमशः) काव्यानंद
Ghajinichi Kalpana aste na, hi Sujata kon ahe? Ani Katakirr kay ahe???
ReplyDeleteSujata : A computer shoppe at Nal Stop
ReplyDeleteKatakirr : Misal Point near Deccan Corner
Thse are our Kernel's Favorite hang-out places, thus mentioned here