Saturday, April 17, 2010

An out of bound sample

Tension आलंय मला जरी सगळे  project झाले   
असे शब्द म्हणतच मेसवर  येतो तो सचिन काळे        
८ मार्कांचं चुकलं म्हणून तब्बल १८ दिवस रडतो    
हंसदा कडे project करायची नवीनच  idea काढतो
हरीत्साने बोलवलं कधी तर जाशील उडत उडत
आणि दिवसभर काम करायचं म्हणून पुन्हा बसशील रडत

सहजच वाचत होतो game theory जरी test नसली आज
इतक्या स्पष्टपणे बोलताना त्याला वाटतही नाही लाज
३ महिन्यापासून म्हणतो आज खेळीन cricket
दुसऱ्या दिवशी नेहमीचंच कारण झालो होतो  late   
सगळ्यात जास्त मार्क्स मिळाल्यावर म्हणतो जरी आत्ता आहे safe 
सगळ्या tests आणि final झाल्यावर बघा ३ विषयात तरी मिळेल F

१५-१६ च्या packege ला म्हणेल बाहेर जायचा करतोय विचार
परदेशात गेलास तरी विसरू नकोस माझे ते मौल्यवान ५० हजार

पूर्वार्ध

    कर्नल दगड हे भारतीय आर्मी मधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्याचे वरिष्ठ अधिकारीदेखील त्याच्याशी अत्यंत आदराने बोलायचे.तसे पाहिल्यास कर्नलच्या व्यक्तिमत्वास तोड नव्हती हेच खरे. कमावलेले शरीर,बुलंद छाती,पहाडी आवाज,कठोर चेहरा आणि एकूणच रुबाबदार अंगकाठी.अनेक तरुणी ह्या पाषाणाच्या मागे घिरट्या घालत होत्या, पण ध्येयवान कर्नलने  कोणालाही दाद दिली नव्हती.
    भारताचे अंतर्गत गुप्तहेर खातेसुद्द्धा ह्या हिऱ्यावर आपले लक्ष ठेवून होते. एक दिवस कर्नलला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बोलावणे आले. तेथे स्वतः गृहमंत्री आणि आणखी २-३ अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी कर्नलला त्यांची ओळख करून दिली. त्यातील एक RAW चे  माजी प्रमुख होते आणि एक IB
चे अत्यंत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी कर्नलला भारताची सध्याची अंतर्गत परिस्थिती कथन केली. देशात त्यावेळेस अत्यंत महागाई वाढली होती. पाण्याची कमतरता जाणवत होती. भ्रष्टाचाराला ऊत आला होता. त्यातच अनेक प्रादेशिक पक्ष नवीन राज्यानिर्मितीच्या मागणीसाठी त्या-त्या राज्यांना वेठीस धरत होते. ह्या प्रादेशिक पक्षांमागे आपल्याच मंत्रांची फूस असावी अशी गृहमंत्र्यांना शंका होती. त्यामुळे ह्या समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी IB ची एक ५-६ जणांची टीम करायचे ठरवले,व त्या टीमचे नेतृत्व करण्याची कर्नलला गळ घालण्यात आली. कर्नलकडे सुवर्णसंधी चालून आली होती. आपल्या देशभक्तीची हीच कसोटी आहे असं त्याला मनातून वाटत होतं. त्यामुळे त्याने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली.
    त्या पथकासाठी आणखी ५ जणांची निवड करण्यात आली. ह्या निवडीत कर्नलने जातीने लक्ष घातले होते. पाचहीजण अत्यंत शूर होते. अर्थात अशा पथकासाठी कर्नलपेक्षा आणखी कोणी योग्य असूच शकत नाही, ह्याविषयी कोणाच्याही मनात दुमत नव्हत.
    हे ५ जण विविध क्षेत्रातील तज्ञ होते. ते त्याला मदत कर्नल असले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरणार नव्हते. ते काम अर्थातच त्यांच्या सर्वगुणसंपन्न नायकावरच सोपवण्यात आले होते. कामगिरी सुरु होण्याआधी सर्वांचे खडतर प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण सामुदायिक तसेच आपापल्या क्षेत्राशी निगडीतही होते. त्यातून तावून सुलाखून बाहेर निघाल्यावर ते कामगिरीसाठी सज्ज झाले होते.
    सर्वाना आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि साधन-सामुग्री देण्यात आली. पथकाचे नामकरण ND-Hard (Non-Destroyable Hard) असे करण्यात आले तर Mission चे नाव होते
                              "Operation State Freezer".
    कर्नलला अनेक मुभा देण्यात आल्या. कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड टॉक-टाईम, हवा तेवढा पैसा, कोठेही लाचारी पत्करण्याची मुभा, इत्यादी. त्यामुळे कर्नलला missed-call ऐवजी आपण call करतो आहोत व हवी तेवढी मिसळ ढोसतो आहोत असं दिवास्वप्न दिसू लागलं. 
   त्याला अत्यंत दुर्मिळ असे स्थान देण्यात आले. त्यामुळे तो आता "Lachar Agent 009" बनला व त्याचा कोडवर्ड होता "बांड, तरणा-बांड".
                                                                             (क्रमशः)
 (जेम्स बॉंड कथेवरून प्रेरित)

एक अजोड व्यक्तिमत्व

पिळदार शरीरयष्टी त्याची झोकदार अशी चाल |
५० वा वाढदिवस जरी साजरा झाला काल ||
लोहासम टणक अशा रोट्या लागतात खायला |
point out केले कुणी तर म्हणतो 'च्यामायला' ||
अटीतटीच्या क्षणीच त्याची ती निर्णायक लाचारी |
जिंकण्याची कल्पनाही येत नाही त्याच्या विचारी ||
डोकं खाजवण्याच्या style वर अख्खं जग आहे फिदा |
काटाकिर्र किंवा सुजाताच्या द्वारी असतो उभा तो सदा |
निर्जीव किल्ले लाजतील ज्यापुढे असा आहे तो THE गड |
सर्वांचाच आदरणीय असा तो महेश लगड ||
                                            काव्यानंद

कॉलेजच्या शेवटच्या दिवसाची कविता

आम्हालाच debug करावा लागेल आता आमचा code |
कारण सोडून चाललो आम्ही protected mode ||
Real mode मध्ये असतील टेन्शन्स जबर |
भेटतील का आम्हा कोणी कोडमेलवार सर ||
आठवतील तुम्हा सगळ्यांना ते माझे missed call |
शिकलात जरी तुम्ही नवीन connection protocol ||
industry तले लाईफ म्हणजे parallel threading चा प्रकार |
जणू मित्रांना भेटायचे वचन, होता inverted होकार ||
म्हणाल college मधल्या मजेची पुन्हा आणू state |
म्हणजे complementary inputs ना लावलंय AND gate ||
Ground वर खेळण्याचा परत येईल जेव्हा chance |
memory तले bits सगळे करतील synchronized dance ||
Object वापरून जेव्हा define करता येईल class |
स्वखर्चाने मी सगळ्यांना party देईन खास ||
जमलं जर कधी तर पुन्हा जरूर भेटा |
माझ्या cache मध्ये असेल तुमचा updated data ||
बाकीच्यांना भेटायची तुम्हाला इच्छा झाली फार |
Kernel ला भेटा त्याच्याकडे आहे scheduling ISR ||
शेवटी सांगतो तुमच्यापैकी कुणी कधी म्हणालं ILU |
Logic नाही त्याच्याकडे नक्कीच corrupted असेल ALU ||
जर माझं technical rhyming वाटलं जुळवलेलं शाब्दिक match |
Exception handle करा तुमचा मूर्खपणाच होईल catch ||
                                                           काव्यानंद