Thursday, July 29, 2010

virtual युद्ध

काल बसल्या बसल्या मी एक शोध लावला जबर
code झाले जिवंत सगळे int main झाला leader

main बसला python वर टाकून ruby जडीत wrapper
java च्या प्याद्यांना हलता येईना त्यांनी catch वर फोडले खापर

pointer रुपी शस्त्राने तो कापू लागला माझ्या binary
emulator ने केले मद्य emulate, WINE ची केली winery

kernel काढले मोडीत त्याने, बनला सगळ्यांचा hero
interrupt call करून मिळवली privilege level zero

hardware केले enumerate त्याने, drivers सगळे फितवले
पाहता पाहता मग त्याला internet रुपी rocket मिळाले

भेदभाव विसरून server आणि client scripts नी केली हातमिळवणी
संदेश पसरवला युद्धाचा त्यांनी, सुरु झाली शस्त्र सामुग्री जुळवणी

देशो-देशीच्या codes नी उडवला युद्ध मुहूर्ताचा बार
नजराणा म्हणून त्यांनी पाठवला library आणि headers चा tar

SIGSTART मिळताच सुरु झाला महायुद्धाचा एकच गजर
ascii files कापल्या आधी मग resources वर गेली नजर

image, audio, video, इतर binary सगळ्यांचेच कोथळे काढले
0,1 आणि letters च्या सड्यांनी सगळे storages चिंब झाले

रौद्र-रूप हे codes चे पाहून system softwares झाले अक्षरशः check-mate
compilers, interpreters, assemblers नी आपले white flag केले set

पण compiled नसतील हे codes तर active कसे काय झाले
खरतर स्वप्नातील infinite recursion जागेपणीच माझ्या वाट्याला आले

                                                                     काव्यानंद